अमेरिकेतील या महिलेला टोचली गेली पहिली करोना लस


फोटो सौजन्य भास्कर
करोना विषाणूची पहिली लस अमेरिकेतील एका ४२ वर्षीय निरोगी महिलेला देण्यात आली असून ही महिला दोन मुलांची आई आहे. सोमवारी सियाटल येथे या लसचा पहिला डोस परीक्षणासाठी या महिलेला टोचला गेला. करोनासाठीची ही लस जगात विक्रमी वेळात बनविली गेलेली पहिली लस बनली असून प्राण्यांवर चाचण्या न करता ही प्रथम माणसालाच दिली गेली आहे.

चीन मध्ये जेव्हा करोनाचा उद्रेक झाला तेव्हाच कायसर पर्मानेन्ट वॉशिंग्टन हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूट मधील संशोधकांनी ही लस तयार करण्यासाठी संशोधन सुरु केले होते. आता या लसीच्या क्लिनिकल ट्रायल सुरु झाल्या असून या महिलेपाठोपाठ आणखी चार निरोगी लोकांना या लसीचे डोस देण्यात आल्याचे समजते.

संशोधकांनी या लसीच्या ट्रायल साठी १८ ते ५५ वयोगटातील ४५ व्हॉलिंटीअर निवडले असून या लसीच्या पूर्ण चाचण्या होऊन ती बाजारात येण्यास आणखी अनेक महिने वाट पहावी लागेल. ही लस पूर्ण सुरक्षित आहे वा नाही हे त्याअगोदर निश्चित करावे लागणार आहे. सध्या या लशीला एम- आरएनए-१२७३ असे नाव दिले गेले आहे. या लसीच्या फेज दोन, फेज तीन ट्रायल घेतल्या जाणार आहेत.

Leave a Comment