15 तासात राज्यात कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही – राजेश टोपे


मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबई पत्रकारांची संवाद साधताना राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आज कोणतीही वाढ झालेली नसून सर्व 39 रुग्णांची परिस्थिती स्थिर आहे. तसेच कॅबिनेटच्या आज होणाऱ्या बैठकीत कोरोनाच्या संबंधात चर्चा होईल. तसेच राज्य सरकारने सर्वोतोपरी खबरादारीचे उपाय केले असल्याची माहिती दिली.

टोपे यावेळी बोलताना म्हणाले की, मागील 15 तासात दररोज होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या वाढीला ब्रेक लागला असून राज्यात मागील 15 तासात कोरोनाच्या रुग्णांमध्ये कोणतीही वाढ झाली नसल्याचे टोपे यांनी यावेळी बोलताना म्हणाले. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, ‘सोशल डिस्टन्सिंग’ हा करण्यात आलेल्या उपाययोजनांचा गाभा आहे. सार्वजनिक ठिकाणी एकमेकांच्या संपर्कात न येता अधिकाधिक अंतर कसे ठेवता येईल यावर सर्वांनी लक्ष द्यावे.

Leave a Comment