कोरोना : आर्थर रोड कारागृहातून 400 कैद्यांना हलवले


मुंबई – केंद्र तसेच राज्य सरकारकडून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रयत्न सुरु असून जनतेला गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे तसचे स्वत: ची काळजी घेण्याचे आवाहन सरकारकडून केले जात आहे. त्यातच आता मुंबईतील आर्थर रोड कारागृहातील 400 कैद्यांना तळोजा कारागृहात हलवण्यात आले आहे. प्रशासनाने हा निर्णय कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घेतला आहे.

केवळ 805 कैद्यांची मुंबईतील आर्थर रोड कारागृहाची क्षमता आहे. पण, या कारागृहात सध्या 3 हजार 400 कैदी राहतात. यातील अनेक कैद्यांच्या सुनावणीला वेळ असल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर केले जाणार नाही. यातील काही प्रकरणाच्या सुनावण्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केल्या जाणार आहेत. त्यामुळे या कैद्यांना तळोजा कारागृहात हलवण्यात आले आहे. विशेष म्हणजे कैद्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी निसर्गोपचारही देण्यात येणार आहे. तळोजा कारागृहाची क्षमता जास्त असल्यामुळे आर्थर रोडवरील कैद्यांना या ठिकाणी हलवण्यात येणार आहे.

Leave a Comment