करोना विरुद्ध बॉलीवूडची एकजूट


फोटो सौजन्य जागरण
करोनाचा फैलाव भारतात होऊ लागल्याचे परिणाम दिसू लागले असून प्रत्येक क्षेत्राला त्यामुळे नुकसान सोसावे लागते आहे. याला बॉलीवूड अपवाद नाही. मात्र बॉलीवूडने एकजुटीने करोना विरुध्द लढाई लढण्याचा निर्धार केला आहे. करोना मुळे सध्या बॉलीवूडचे नुकसान ५०० ते ८०० कोटींच्या दरम्यान गेले आहे असे समजते.

करोना प्रसार रोखण्यासाठी सरकारने चित्रपटगृहे बंद केली आहेत. या पार्श्वभूमीवर चित्रपट संघटना एकत्र झाल्या असून त्यांनी सर्व चित्रपटांची शुटींगही बंद केली आहेत. १९ ते ३१ मार्च पर्यंत शुटींग बंद राहणार आहेत. भूलभूलैया २, ब्रह्मास्त्र या चित्रपटांचे शुटींग पूर्वीच बंद केले गेले आहे. अधिक संख्येने लोक एकत्र येऊ नयेत म्हणून ही खबरदारी घेतली जात आहे. मार्च अखेरी अनेक फिल्म रिलीज केल्या जाणार होत्या त्यांच्या डेट पुढे ढकलल्या गेल्या आहेत. त्यात सूर्यवंशी, ८३, संदीप और पिंकी, फरार यांचा समावेश आहे.

सेलेब्स आणि कलाकार यांचे सतत नवनवे फोटो काढण्यासाठी गर्दी करणारे फोटोग्राफर यांनी कार्यक्रमापासून दुरी राखली आहे आणि गर्दीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक कलाकारांनी त्यांचे पूर्वनियोजित शो कॅन्सल केले आहेत. तसेच पार्टी, कॉन्सर्ट रद्द केल्या आहेत. एका जागी खूप लोक एकत्र येऊ नयेत हाच त्यामागचा हेतू आहे. अनेक कलाकारांनी त्याच्या सोशल मिडिया अकौंटवरून जनजागृती करण्याचे काम हाती घेतले आहे. फोटो, व्हिडीओ त्यातून ते चाहत्यांशी संपर्क साधत आहेत, संदेश देत आहेत.

Leave a Comment