करोनामुळे चीन मध्ये वाढले घटस्फोट


करोना विषाणूमुळे जगभरात सर्व क्षेत्रात विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आले असतानाच आता या विषाणूचा मानवी नातेसंबंधांवर सुद्धा वाईट परिणाम झाला आहे. चीन मध्ये या विषाणूचा प्रभाव कमी होत असला तरी येथे विवाहित जोडप्यांच्या घटस्फोट घेण्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. याचे कारण करोनाच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

चीनच्या शिचूआन भागात एक महिन्यात ३४० घटस्फोट नोंदविले गेले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे करोनाच्या प्रभावामुळे लोकांना महिनाभर घराच्या बाहेर पडता आले नाही. त्यामुळे पती पत्नी याच्यातील वाद वाढले. त्याचा परिणाम एकमेकांपासून विभक्त होण्यात झाला आहे. डाझाऊ भागातील विवाह नोंदणी मॅनेजर लु शीजून याच्या म्हणण्याप्रमाणे अक्षरशः शेकडो जोडप्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केले आहेत.

एकमेकांच्या सहवासात गरजेपेक्षा अधिक काळ राहिल्याने विवाहित जोडप्यातील विसंवाद वाढला आहे. त्यामुळे त्याच्या नात्यावर नकारात्मक परिणाम होतो आहे. करोनाच्या प्रभावामुळे विवाह नोंदणी ऑफिस एक महिना बंद होते त्याकाळात घटस्फोटाच्या पेंडिंग केसेस मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत असेही ते म्हणाले.

दुसरीकडे चीन पाठोपाठ इटली मध्ये करोनाचा प्रभाव खूप वाढला आहे. त्यामुळे येथेही लोकांना घराबाहेर पडणे शक्य नाही. इटली मध्ये या काळात इंटरनेटच्या मागणीत प्रचंड वाढ दिसून येत असून इंटरनेटची मागणी ७० टक्क्यांनी वाढल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment