कोरोनाची भीती दूर करण्यासाठी शिवभोजन थाळीत चिकन


रत्नागिरी : कोरोना व्हायरसचा जगभरातील सर्वांनीच धसका घेतला आहे. सध्या सोशल मीडियावर कोरोना संदर्भातील अफवा अनेक पाहायला मिळत आहेत. त्यातच सध्या चिकन व्यवसायाला चिकन खाल्ल्याने कोरोना होतो या अफवेमुळे उतरती कळा लागली. त्यामुळे चिकन खाल्ल्याने कोरोना होत नाही हे सांगण्यासाठी रत्नागिरीत अनोखी शक्कल लढवण्यात आली. नागरिकांच्या मनातील कोरोनाची भीती दूर करण्यासाठी शिवभोजन थाळीसोबत चक्क चिकन देण्यात येत आहे.

नागरिकांमध्ये सध्या महाराष्ट्र सरकारने सुरु केलेली शिवभोजन थाळी प्रसिद्ध असून यासाठी त्याचाच वापर करण्यात येत आहे. रत्नागिरी एसटी स्टॅण्ड जवळच्या शिवभोजन केंद्रावर शिवभोजन थाळीमधून चक्क चिकनची डिश देण्यात आली. त्याचबरोबर आता शिवभोजन थाळीत दर बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी शाकाहारी सोबत चिकन देखील दिले जाणार आहे. हि चिकनची डिश शिवभोजन थाळीच्या दरात म्हणजे दहा रुपयाच्या दरात देण्यात येणार आहे.चिकन खाल्ल्याने कोरोना होत नाही हे सांगण्यासाठी उपक्रम राबवण्यात येत आहे.

Leave a Comment