अनिल अंबानींना ‘येस बँक’ प्रकरणी ‘ईडी’चे समन्स!


मुंबई – ‘ईडी’मार्फत येस बँक प्रकरणी बँकेचे माजी संस्थापक राणा कपूर यांची चौकशी सुरू असतानाच ईडीकडून अनिल अंबानी यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. या प्रकरणी अनिल अंबानी यांना सोमवारी ईडी कार्यालयात हजर व्हायचे होते, पण अनिल अंबानी यांनी प्रकृतीच्या कारणास्तव पुढील तारखेची मागणी केल्याचे ईडी सूत्रांकडून कळत आहे.

‘मनी लाँड्रिंग’च्या संदर्भात राणा कपूर यांची ईडीमार्फत चौकशी सुरू आहे. येस बँकेकडून अनिल अंबानी यांनी तब्बल 12 हजार 800 कोटींचे कर्ज घेतले आहे. अद्याप जे भरण्यात आलेले नाही. येस बँकेचे मोठे कर्जदार म्हणून अनिल अंबानी ग्रुप, एस्सेल ग्रुप, व्होडाफोन, आयएलएफएस, डिएचएफएल यांसारख्या कंपन्यांनी मोठे कर्ज घेतले आहे. या कर्जाची परतफेड होण्यास विलंब होत आहे. या सर्व कंपन्यांच्या प्रमुखांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स बजवण्यात येत आहेत. यातच आता अनिल अंबानींनाही समन्स बजावण्यात आले आहे.

Leave a Comment