बाजारपेठेत लवकरच दाखल होणार सॅमसंगचा स्वस्तातला टिव्ही

सॅमसंगने भारतात स्वस्तातले स्मार्ट टिव्ही लाँच केले आहेत. कंपनीने फनबिलिव्हेबल सीरिज अंतर्गत भारतात 32 इंच आणि 43 इंच व्हेरिएंटचे टिव्ही लाँच केले असून, या टिव्हींची किंमत 12,990 रुपयांपासून पुढे आहे. हे सर्व टिव्ही सॅमसंग स्मार्ट प्लाझा, प्रमुख इलेक्ट्रॉनिक स्टोर आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असतील.

या टिव्हींची खास गोष्ट म्हणजे यात पर्सनल कॉम्प्यूटर मोडची सुविधा देखील मिळेल. याद्वारे ग्राहक स्मार्ट टिव्हीला पर्सनल कॉम्प्युटरमध्ये बदलू शकतात. केवळ ब्राउजिंगसाठी न वापरता, याचा उपयोग अनेक कारणांसाठी करता येईल.

टिव्हीचा वापर करून मुले शाळेसंबंधी काम करू शकतात तर ऑफिसमधील कामे देखील टिव्हीवर करता येईल. यावर प्रेझेंटेशन बनवणे देखील सोपे आहे.

Leave a Comment