18 तारखेला हटणार येस बँकेवरील निर्बंध

येस बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी सरकारतर्फे प्रयत्न केले जात आहे. या अंतर्गत आता 18 मार्चला येस बँकेवरील निर्बंध हटवले जातील. सध्या प्रशांत कुमार यांची बँकेचे सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

नॉटिफिकेशनुसार, येस बँकेच्या पुनर्रचना योजना 2020 ला 13 मार्चपासून सुरूवात होईल.

आरबीआयतर्फे 5 मार्च येस बँकेवर 3 एप्रिलपर्यंत निर्बंध घालण्यात आले होते. या अंतर्गत खातेधारकांना बँकेतून केवळ 50 हजार रुपये काढण्याची परवानगी होती. मात्र आता बँकेच्या पुनर्रचना योजनेनंतर 18 मार्चला निर्बंध हटवले जाणार आहेत. 18 मार्चला सायंकाळी 6 वाजल्यानंतर खातेधारकांना पैसे काढता येतील.

Leave a Comment