ओटावा – आत्तापर्यंत जगभरातील १०० पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून कोरोनाची अनेक देशांमध्ये सर्वसामान्य नागरिकांसोबत उच्चपदस्थ अधिकारी आणि राजकारण्यांनाही लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कॅनडाच्या पंतप्रधानांच्या पत्नीला कोरोनाची बाधा झाल्याचे नुकतेच स्पष्ट झाले आहे.
कॅनडाच्या पंतप्रधानांच्या पत्नीदेखील कोरोनाच्या विळख्यात
कोरोनाची पंतप्रधान जस्टीन ट्र्यूडेयू यांची पत्नीला लागण झाली आहे. हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता टॉम हँक्स आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची बाधा झाल्याचे काल (गुरुवार) स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर इराणमधील अनेक राजकारणी आणि आरोग्य अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर अनेकांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनामुळे ४ हजार नागरिकांचा अनेक देशभरामध्ये मृत्यू झाला आहे. तर १०० पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाची लागण झाली आहे. अनेक देशांनी प्रवासावर निर्बंध लागू केले आहेत. भारतामध्ये आत्तापर्यंत ७७ जणांना कोरोनाची लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला जागतिक महामारी घोषित केले आहे.