व्यायाम आणि जीम या गोष्टी तरुणाईसाठी असतात असा काहीसा समज आहे. मात्र कॅनडाच्या एका 73 वर्षीय वृद्ध महिलेने हा समज खोटा ठरवला आहे. कॅनडाच्या ओंटारियो येथे राहणाऱ्या 73 वर्षीय जोन मॅकडोनाल्ड या वयात देखील बॉडी बिल्डिंग करत आहेत. यामुळे त्यांच्या आरोग्यावर देखील चांगला परिणाम झाला आहे.
73 वर्षीय महिला बॉडी बिल्डर झाली सोशल मीडिया स्टार
आधी त्यांना अधिक वजनामुळे त्रास सहन करावा लागत असे. त्यांना उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रोल आणि एसिड रिफ्लक्ससह अनेक समस्या जाणवत असे. मागील 3 वर्षांपासून जोन जीममध्ये घाम गाळत आहे. या दरम्यान त्यांनी स्वतःचे वजन 90 किलोवरून कमी करून 69 किलो केले आहे.
जोन मॅकडोनाल्ड आता सोशल मीडिया सेलिब्रेटी देखील झाल्या आहेत. त्यांचे इंस्टाग्रामवर 5 लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. जोन आपल्या वर्कआउटचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.
