तुम्ही चक्क झोपण्याच्या व्हिडीओने कमवू शकता लाखो रुपये

जर एखाद्याने तुम्हाला झोपण्यासाठी पैसे दिले तर हे स्वप्नातील नोकरीपेक्षा कमी नसेल. मेहनत करण्यापेक्षा झोपून पैसे मिळत असेल, तर अशी नोकरी कोणाला नको असेल. अशीच एक संधी ट्विच (twitch) नावाची एक कंपनी देत आहे. पॉप्युलर स्ट्रिमिंग वेबसाईट ट्विच युजर्सला झोपण्यासाठी लाखो रुपये देत आहे. याद्वारे युजर्स एका रात्रीतून लाखो रुपये कमवू शकतात.

यासाठी तुम्हाला झोपण्याच्या आधी तुमच्या बेडच्या दिशेने वेबकॅम करावा लागेल. जेणेकरून व्हिडीओ आणि लाईव्ह स्ट्रिमिंग रेकॉर्ड होऊ शकेल. या वेबसाईटवर युजर्स झोपण्याशिवाय काहीही करताना लाईव्ह स्ट्रिमिंग करू शकतात.

काही युजर्स या कला, म्यूझिक, गेमिंगचे देखील लाईव्ह स्ट्रिमिंग करतात. पैसे कमविण्यासाठी युजर्स सब्सक्रिप्शन, जाहिरात आणि डोनेशनची मदत घेतात. व्हिडीओ लाईव्ह स्ट्रिमिंग होत असताना फॉलोअर्स पैसे दान करतात.  अमेरिकेतील एका व्हिडीओ मेकरने सांगितले की, त्याने एका रात्री स्वतःला झोपताना लाईव्ह स्ट्रिम करून 5,600 डॉलर (जवळपास 4,14,00 रुपये) कमवले.

Leave a Comment