मलायकाचा हा व्हिडीओ पाहून नटेकरी पडले बुचकुळ्यात


बॉलिवूडमधील जवळपास सर्वच अभिनेत्री या आपल्या फिटनेसबाबत फारच जागरूक असतात. त्यामुळे त्यांच्या फिटनेसच्यासोबतच वर्कआऊट फॅशनचा नवीन ट्रेण्डच रुजु झाला आहे. त्यातच हे सेलिब्रिटी जिमला जाताना कशाप्रकारचे कपडे घालतात, याबाबत नेटकऱ्यांमध्ये कमालीच उत्सुकता देखील दिसून येते.


चाहत्यांपर्यंत सेलिब्रिटींची जिम फॅशन पोहोचवण्यासाठी जिमबाहेर पापाराझी कायमच सज्ज असतात. त्यातच सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री मलायका अरोराचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. पण मलायकाने वर्कआऊट फॅशनच्या नावाखाली नेमके काय कपडे घातले आहेत यामुळ नेटकरी बुचकुळ्यात पडले आहेत.

मलायका या व्हिडीओमध्ये गाडीतून बाहेर येते आणि जिमच्या दिशेने चालू लागते. ती तिथे उभ्या असलेल्या पापाराझींना पोझसुद्धा देते आणि निघून जाते. मलायकाने यावेळी स्कीन कलरचा जिमसूट परिधान केला होता. तिच्या शरीराच्या रंगासारखाच तो रंग असल्याने तिने कपडे घातले आहेत की नाहीत असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. अनेकांनी मलायकाला या कपड्यांवरून ट्रोलसुद्धा केले आहे.

Leave a Comment