परदेशवारीची माहिती लपवणाऱ्यांवर करणार कारवाई


तिरुवअनंतपूर – केरळच्या आरोग्य मंत्री के. के शैलजा यांनी परदेशातून जे नागरिक भारतात परतल्यानंतर आपण कोणकोणत्या देशात प्रवास केला याबाबतची माहिती लपून ठेवतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, त्याचबरोबर प्रवासासंदर्भात माहिती लपवणे हा गुन्हा असल्याचे स्पष्ट केले आहे. केरळमध्ये काल आणखी ६ कोरोनाग्रस्त सापडल्याने राज्य सरकारने कडक निर्बंध लागू करण्यास सुरूवात केली आहे.

परदेशातून आलेल्या व्यक्तींनी जर आपली माहिती लपवली, तसेच त्याची सुचना आरोग्य विभागाला दिली नाही तर इतर नागरिकांना त्यांच्यापासून कोरोना होण्याचा धोका आहे, अशी माहिती लपवणाऱ्या प्रवाशांवर योग्य ती कारवाई केली जाईल. कोरोनाचा प्रसार जास्त झालेल्या देशांतून माघारी आल्यानंतर माहिती लपविल्यास त्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

आत्तापर्यंत ९ कोरोना बाधित रुग्ण केरळमध्ये सापडल्यामुळे योग्य त्या उपाययोजना करण्यास राज्य सरकराने सुरुवात केली आहे. कोरोनाग्रस्त कुटुंबिय आणि संपर्कात आलेल्या नागरिकांवरही लक्ष ठेवण्यात येत आहे. राज्यभर कोरोनाचा प्रसार होण्याच्या भीतीने राज्याने लोकांमध्ये जनजागृतीही सुरू केली आहे.

Leave a Comment