राजकारणात हॉर्स ट्रेडिंग नक्की काय असते ?

मध्य प्रदेशमध्ये सध्या राजकीय गदारोळ सुरू आहे. राज्यातील कमलनाथ सरकार संकटात सापडले असून, काँग्रेसच्या 22 आमदारांनी राजीनामा दिला आहे. यामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात आले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने भाजपवर हॉर्स ट्रेडिंगचा (घोडेबाजार) आरोप केला आहे. मध्य प्रदेशमधील काँग्रेस नेते आरोप करत आहेत की, भाजप काँग्रेस आमदारांना प्रलोभन देत आहे. अखेर हॉर्स ट्रेडिंग शब्दाचा अर्थ काय ?, हे जाणून घेऊया.

हॉर्स ट्रेडिंग म्हणजे काय ?

कॅम्ब्रिज डिक्शनरीमध्ये या शब्दाला सर्वात प्रथम सादर करण्यात आले. डिक्शनरीमधील या शब्दाचा अर्थ, पडद्यामागील अशी चर्चा, जेथे दोन्ही पक्ष असा करार करतात ज्यात दोघांचाही फायदा होतो.

सांगण्यात येते की 1820 दरम्यान हा शब्द प्रयोग व्यापारी घोड्यांची खरेदी विक्रीसाठी करत असे.  या काळात घोड्यांच्या खरेदी-विक्रीसाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जात, त्यालाच हॉर्स ट्रेडिंग म्हटले जाते. नंतर या शब्दाचा वापर राजकीय अर्थांसाठी करण्यात येऊ लागला.

राजकारणात हॉर्स ट्रेडिंग शब्दाचा वापर –

भारतीय राजकारणात या शब्दाचा भरपूर वापर केला जातो. भारतीय राजकारणात या शब्दाचा वापर खासदार आणि आमदारांना प्रलोभन देण्यासाठी केला जातो. जेव्हा कोणाच्या फायद्यासाठी सरकार अस्थिर करण्यासाठी खासदार अथवा आमदार पक्ष सोडतात, तेव्हा त्याला हॉर्स ट्रेडिंग म्हणतात. याशिवाय एखाद्या विधेयकाचे समर्थन करणे अथवा विश्वासमताचे समर्थन किंवा विरोध करण्यासाठी देखील या शब्दाचा उपयोग होतो. थोडक्यात, राजकीय प्रतिनिधींच्या खरेदी-विक्रीला हॉर्स ट्रेडिंग म्हटले जाते.

कर्नाटकमध्ये काँग्रेसचा पाठिंबा असणारे एच डी कुमारस्वामी यांचे सरकार पडले होते, त्यावेळी देखील काँग्रेसने भाजपवर हॉर्स ट्रेडिंगचा आरोप केला होता.

मध्य प्रदेशमध्ये सुरू असलेल्या राजकीय गदारोळात आता काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी भाजप नेते शिवराज सिंह चौहान, नरोत्तम मिश्रा, संजय पाठक, विश्वास सारंग, भूपेंद्र सिंह यांच्यावर हॉर्स ट्रेडिंगचा आरोप केला आहे.

Leave a Comment