स्फोटांची माहिती देण्यासाठी अमेरिकेने तयार केले बॉडी आर्मर सेंसर

अमेरिकन सैन्याच्या गणवेशात लवकरच बॉडी आर्मर सेंसर लावले जाणार आहे. हे आर्मर सैनिकांना स्फोटांची माहिती देईल व ब्रेन डॅमेज होण्यापासून देखील वाचवेल. प्रत्येक सैनिकाच्या आर्मरमध्ये तीन गेज असतील. हे हेल्मेट, चेस्ट आणि शोल्डरच्या येथे बसवले जाते. स्फोटानंतर सैनिकाला वैद्यकीय गरज असल्याची देखील माहिती देईल.

या आर्मरमध्ये स्फोटाच्या प्रेशर पाउंट पर स्क्वेअर इंचामध्ये (पीएसआय) मापण्याची क्षमता आहे. हे फ्रिक्वेंसीनुसार लायटिंग इंडिकेशन देईल. स्फोटाचा प्रेशर एक ते चार पीएसआय असेल तेव्हा हिरवी लाइट लागेल. 4 ते 16 या दरम्यान प्रेशर असल्यास पिवळी लाइट लागेल आणि यापेक्षा अधिक प्रेशर असल्यास आर्मर लाल लाइटीद्वारे संकेत देईल.

रिपोर्टनुसार, जवळपास 12 ते 36 सैनिकांच्या 58 मिलिट्री यूनिटला 4409 सेट्स देण्यात आले आहेत. हे सेट्स बी3जी7 (ब्लॅकबॉक्स बायोमॅट्रिक 7 जनेरेशन ब्लास्ट गेज) आहेत.

वैज्ञानिक मागील 20 महिन्यांपासून बॉडी आर्मर प्रोजेक्टवर काम करत आहेत. चाचणीसाठी याला युद्ध अभियान आणि ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देखील समावेश करण्यात आले होते. या आर्मरद्वारे सैनिक किती प्रेशर असणाऱ्या स्फोटाच्या जवळ आहेत, याची माहिती मिळेल.

Leave a Comment