होळी खेळताना अशी करा पाण्याची बचत

देशभरात होळीच्या सणाची तयारी सुरू झाली आहे. होळी-धुलीवंदनाच्या निमित्ताने लोक रंगांसोबत पाण्याचा देखील मोठ्या प्रमाणात वापर करतात. यामुळे खूप पाणी वाया जाते. धुलवड खेळून झाल्यानंतर देखील कपडे व घराची सफाई करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होते. होळी-धुलवडीच्या दिवशी पाण्याची बचत करण्यासाठी काही टिप्स जाणून घेऊया.

पाण्याचे योग्य प्रमाण –

धुलवडीच्या दिवशी तुम्हाला किती पाणी वापरायचे आहे, त्याची आधीच तयारी करून ठेवा. घरापासून लांब गार्डन अथवा मोकळ्या जागेत होळी खेळा व पाणी एका मोठ्या भांड्यात ठेवा. यामुळे पाण्याचा तेवढाच वापर होईल व घरापासून लांब खेळल्याने घर खराब देखील होणार नाही.

नैसर्गिक रंगांचा वापर करा –

नैसर्गिक रंगांचा वापर केल्याने त्वचेचे देखील नुकसान होत नाही. तसेच हा रंग त्वचेवरून त्वरित जातो. यासाठी पाणी देखील जास्त लागत नाही. सुक्या रंगाचा वापर अधिक करा, जेणेकरून पाण्याचा वापर कमी होईल.

गडद रंगाचे कपडे –

धुलवडीला पाण्याच्या फुग्यांचा वापर कर नये. यामुळे पाण्याची अधिक नासाडी होते व दुसऱ्या व्यक्तीला इजा होण्याची देखील शक्यता असते. धुलवडीला शक्यतो गडद रंगाचे कपडे घालावे. गडद रंगाच्या कपड्यांना साफ करणे सोपे असते व जास्त पाण्याचा देखील वापर होत नाही. रंग खेळण्याआधी त्वचा व केसांना ऑइलच्या मदतीने सुरक्षित करावे. जेणेकरून त्वचेला रंग लागणार नाही व साफ करताना पाणी देखील अधिक वाया जाणार नाही.

Leave a Comment