मालकाने जीपीएसने गाडी केली लॉक, पोलीस 3 तास अडकले आत

उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथील गोमती नगर पोलीस स्टेशनमध्ये दरोड्याच्या घटनेचे प्रकरण पोहचले. मात्र स्टेशनचे पोलीस कर्मचाऱ्याने कोणतीही एफआयआर न नोंदवता गाडीला स्टेशनमध्येच लावण्यास सांगितले. एवढेच नाही तर त्यानंतर 4 पोलीस कर्मचारी त्याच कारमध्ये एका प्रकरणात लखीमपूरा येथे रवाना झाले.

गाडीच्या मालकाला जीपीएसमध्ये गाडीचे लोकेशन लखीमपूर दिसल्यानंतर त्याने कार चोरी झाल्याच्या संशयाने थेट कारला जीपीएस लॉक केले. या नंतरची परिस्थिती फारच अवघड झाली. कर्मचाऱ्यांना गाडीतून बाहेर पडता येत नव्हते. अखेर त्यांनी गाडी मालकालाच फोन लावला.

अखेर कसे तरी करून जीपीएस लॉक उघडत कर्मचारी लखनऊला परतले. सोशल मीडियावर हे प्रकरण व्हायरल झाल्यानंतर पोलीस कमिश्नर सुजीत पांडे यांनी या संदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. तर अतिरिक्त इंस्पेक्टर देवेंद्र कुमार यादव यांना निलंबित करण्यात आले आहे. ही गाडी संयज सिंह नावाच्या एका व्यक्तीचे होती. त्यांनी या संदर्भात अंखड प्रताप नावाच्या व्यक्तीने गाडी चोरी केल्याची तक्रार देखील दाखल केली होती.

Leave a Comment