जाणून घ्या व्हायरल होणाऱ्या 1,000 रुपयांच्या नोटेमागील सत्य

नोटबंदीनंतर सरकार नवीन नोटा जारी करत आहे. काही दिवसांपुर्वीच 1 रुपयांची नोट बाजारात आल्याची माहिती समोर आली होती. आता सोशल मीडियावर 1,000 रुपयांच्या नोटेचा फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये एक तपकिरी रंगाची नोट दिसत आहे. या नोटेवर महात्मा गांधींच्या फोटो व्यतिरिक्त रुपयाचे चिन्ह देखील आहे.

या फोटोसोबत दावा केला जात आहे की, 1,000 रुपयांची नोट जारी करण्यात आली आहे. जर तुम्हाला हा मेसेज अथवा फोटो आला तर त्यावर विश्वास ठेऊ नका. रिझर्व्ह बँकेने 1 हजार रुपयांची कोणतीही नवीन नोट जारी केलेली नाही.

प्रेस इंफॉर्मेशन ब्यूरोने देखील ही माहिती फेक असल्याचे ट्विट केले आहे. त्यामुळे 1 हजार रुपयांच्या नोटेबाबतची माहिती पुर्णपणे असत्य आहे.

Leave a Comment