‘सूर्यवंशी’च्या नव्या पोस्टरवर झळकली कतरिना कैफ


या महिन्यात दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि खिलाडी कुमार अर्थात अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित ‘सूर्यवंशी’ चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आल्यानंतर आता चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे. या ट्रेलरमध्ये अक्षय कुमारसोबत अजय देवगन, रणवीर सिंग आणि कतरिना कैफ यांचीही झलक पाहायला मिळाली. आता ‘सूर्यवंशी’चे कतरिना आणि अक्षयचा एकत्र लुक असलेले नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

View this post on Instagram

#Sooryavanshi

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on


‘सूर्यवंशी’ चित्रपटाचे हे नवे पोस्टर कतरिना कैफने सोशल मीडियावर शेअर केले आहे. अक्षय आणि कतरिनावर चित्रीत झालेले ‘टीप टीप बरसा पानी’ हे गाणे ‘सूर्यवंशी’ चित्रपटात देखील पाहायला मिळणार आहे. या गाण्याचाही प्रेक्षकांना आतुरता आहे. रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समधला हा चौथा चित्रपट आहे. ‘सूर्यवंशी’च्या मदतीला धावून येण्यासाठी अजय देवगन ‘सिंघम’च्या रुपात तर, रणवीर सिंग ‘सिंबा’च्या रुपात चित्रपटात दिसणार आहे. या तिघांचीही दमदार एन्ट्री ट्रेलरमध्ये दिसली आहे. या चित्रपटात महत्वपूर्ण अभिनेता जॅकी श्रॉफ, गुलशन ग्रोवर आणि सिकंदर खेर यांचीही भूमिका पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट २४ मार्चला रिलीज होणार आहे.

Leave a Comment