मायबोलीत वेब पेज वाचून दाखवणार गुगल अस्टिटंटचे नवे फिचर


आपल्या प्रोडक्ट्सला अधिक चांगल्या दर्जाचे बनवण्यासाठी गुगल त्यांचे नवे नवे फिचर्स लॉन्च करत आहे. याच दरम्यान आता कंपनीने गुगल अस्टिटंटसाठी एक नवे फिचर आणले आहे. अॅन्ड्रॉइड स्मार्टफोन या फिचरच्या माध्यमातून डिजिटल असिस्टंट वेब पेज वाचून दाखवणार आहे. कंपनीने गुगल असिस्टंटच्या या नव्या फिचरला Read It असे नाव दिले आहे. हे फिचर रोलआउट करताना गुगलने असे म्हटले आहे की, हे फिचर युजर्सच्या स्मार्टफोनवरील कन्टेट वाचून दाखवणार आहे.

भारतीय भाषांना गुगलचे नवे फिचर सपोर्ट करते. Hey Google किंवा Hello Google बोलून गूगल असिस्टंट सुरु करता येणार आहे. Read it कमांड वेब पेज वाचण्यासाठी द्यावी लागणार आहे. 28 भारतीय भाषांना गुगलचे हे नवे फिचर सपोर्ट करणार आहे. यामध्ये हिंदी, गुजराती, मराठी, तमिळ, तेलगू, मल्याळम, बंगाली आणि उर्दू भाषांचा सुद्धा समावेश आहे. सध्या रीड इट हे फिचर फक्त इंग्रजी भाषेला सपोर्ट करते. गुगलने असे म्हटले आहे की, 42 विविध भाषांमध्ये वेब पेजसाठी लाइव्ह ट्रान्सलेशन सुद्धा घेऊन येणार आहे. त्यानुसार प्रत्येकाला त्यांच्या मायबोली भाषेत वेब पेज वाचून दाखवले जाणार आहे.

खास AI एल्गोरिद्मवर रिड इट हे फिचर काम करते. वेब पेजमधील कोणता भाग याच्या मदतीने वाचून दाखवायचा आहे हे समजते. त्याचबरोबर कोणत्याही वेब पेजमध्ये समस्या असल्यास त्याबाबत सुद्धा युजर्सला सांगणार आहे. सध्या इंटरनेटवरील आर्टिकल आणि ब्लॉग पोस्टचा कन्टेट वाचण्यासाठी रिड इट हे फिचर मदत करणार आहे.

Leave a Comment