पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांवर पाच वर्षात 446 कोटी खर्च


नवी दिल्ली – जेव्हापासून नरेंद्र मोदी हे देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत तेव्हापासून त्यांचे परदेश दौरे हे कायमच चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांच्या दौऱ्यांमागे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे संबंध सुधारण्यासाठीचे कारण जरी सांगण्यात येत असले किंबहुना आवश्यक जरी वाटत असले तरी या दौऱ्यांवर होणाऱ्या खर्चाचे आकडे ऐकून कोणालाही धक्का बसेल.

याच विषयावरून काही दिवसांपूर्वी मोदींच्या परदेश दौऱ्यांच्या खर्चाबाबत विचारणा करण्यात आली होती, ज्यावर पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर पाच वर्षात सुमारे 446 कोटी खर्च झाल्याचे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधर यांनी लेखी उत्तर देऊन सांगितले. चार्टर्ड विमानांचा खर्चही पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांमध्ये झालेल्या खर्चांमध्ये सामिल असल्याचे मुरलीधर यांनी दिलेल्या उत्तरात स्पष्ट करण्यात आले आहे. 2015-16 या कालावधीत त्यांच्या परदेश दौऱ्यांवर 121.85 कोटी रूपयांचा सर्वाधिक खर्च झाल्याची माहिती आहे, तर त्या पाठोपाठ, 2016-17 या कालावधीत 78.52 कोटी रूपये खर्च 2017-18 मध्ये 99. 90 कोटी रूपये, तर 2018-19 मध्ये 100.02 कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला असल्याचे सुद्धा या उत्तरात समोर येत आहे.

Leave a Comment