गगनयान मॉडेलच्या चाचणीस सुरूवात

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) आपले पहिले मानवी मिशन गगनयानला यशस्वी बनविण्यासाठी बंगळुरू येथील इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स येथील ओपन-सर्किट विंड टनल येथे टेस्टिंग करत आहेत. जर गगनयानचे मॉडेल या चाचणीत यशस्वी झाले तर त्याच्या आधारावर एक प्रोटोटाइप तयार केले जाईल. अयशस्वी झाल्यास यात अनेक बदल केले जाऊ शकता. याआधी देखील गगनयानच्या अनेक चाचण्या करण्यात आलेल्या आहेत.

या विंड टनलची निर्मिती वर्ष 1950 मध्ये सुरू झाली होती. त्यानंतर वर्ष 1959 मध्ये म्हैसूरचे राजा जय चामराजेंद्र वाडियार यांच्या हस्ते या टनलचे उद्घाटन झाले होते. या टनलमध्ये एक कूलिंग टॉवर आहे. सोबतच या टनलमध्ये विमान, जहाज आणि अंतराळ लाँचिंग व्हिकलची चाचणी घेतली जाते. चाचणी पुर्ण झाल्यानंतर मॉडेलमधील चुका दुरूस्त करून त्यात सुधारणा केली जाते. या आधी इस्त्रो चाचणीसाठी लाकडाच्या मॉडेलचा वापर करत असे.

या विंड टनलला 1.4 लाख रुपयांमध्ये बनविण्यात आले होते. हे विंड टनल 20 फूट रुंद आणि 80 फूट लांब आहे. याच्या एकाबाजूला 16 मीटरचे दोन पंखे आहेत. ज्यातून ताशी 160 किमी वेगाने वारे वाहते. या टनलमध्ये हवेच्या दाबाने मॉडेलवर चाचणी होते. सोबतच मॉडेल मजबूत आहे की नाही हे तपासले जाते.

दरम्यान गगनयानसाठी निवड झालेले अंतराळवीर सध्या रशियामध्ये प्रशिक्षण घेत असून, हे प्रशिक्षण 1 वर्ष चालेल.

Leave a Comment