
मुंबई – काही वेळापूर्वीच आपण सोशल मीडिया सोडण्याचा विचार करत असल्याचे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे याबाबतचा अंतिम निर्णय रविवारी जाहीर करणार आहेत. पण अमृता फडणवीस यांनीही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत सोशल मीडियाला रामराम करण्याचे संकेत दिले आहेत.
मोदींच्या पावलावर पाऊल ठेवणार अमृता फडणवीस
याबाबतचे ट्विट करताना, अमृता फडणवीस यांनी लहानसे निर्णयही कधी कधी आपले आयुष्य बदलणारे ठरतात. माझ्या नेत्याच्या पावलावर पाऊल मी ठेवेन असे म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी सोशल मीडियाचा निरोप घेण्याचे संकेतही दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच सोशल मीडिया सोडण्याचा विचार करत असल्याचे म्हणत आपण याबाबतचा अंतिम निर्णय रविवारी घेऊ असे म्हटले आहे.
