कुमारी माता झालेल्या अभिनेत्रीचा तरुणींना मोलाचा सल्ला


अभिनेता आयुष्मान खुराणाच्या ‘बधाई हो’, ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ सारख्या चित्रपटाद्वारे ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी सिनेसृष्टीत पुनरागमन केले. नीना गुप्ता ह्या सोशल मीडिया नेहमीच अॅक्टिव्ह असतात. त्याचबरोबर त्या आपल्या सोशल मीडियावर वैयक्तिक तसेच प्रोफेशनल आयुष्यातील अनेक घटना शेअर करत असतात. दरम्यान नुकतीच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्यांनी अत्यंत खाजगी बाबीला हात घातला आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत त्यांनी त्यांच्या एका अफेअरबाबत भाष्य केले आहे.

View this post on Instagram

#sachkahoontoe

A post shared by Neena ‘Zyada’ Gupta (@neena_gupta) on


या व्हिडीओमध्ये नीना गुप्ता सांगतात की, हे डायलॉग्स तुम्ही खूप वेळा ऐकले असाल. तो तुम्हाला सांगेल की त्याचे आता त्याच्या पत्नीवर प्रेम नाही आहे आणि तो सध्या तिच्याबरोबर राहत नाही. तुम्ही त्याला सारखे विचाराल की मग तु तिच्यापासून वेगळे का नाही राहत. सध्या नको असे सांगत, तो पुढे जात राहील. मग तुमच्या आशा वाढतात. सुरूवातीला काही वेळाच तुम्ही भेटता. त्यानंतर एखाद्या सुट्टीचा वगैरे प्लॅन करायचा असेल तर त्याला प्रॉब्लेम असतो. मग खोट बोलून तो तुमच्याबरोबर येतो. मग त्याच्याबरोबर तुम्हाला रात्र घालवायची असते. मग यामध्ये वाढ होऊ लागते. मग सहाजिकच त्याच्याशी तुम्हाला लग्न करायचे आहे, असे वाटू लागते. मग तुम्ही त्याला गळ घालायचा प्रयत्न करू लागता की, त्याने त्याच्या पत्नीला घटस्फोट द्यावा. ही गोष्ट तो वेगवेगळी कारणे देऊन टाळू लागतो. ज्याचा त्रास तुम्हाला देखील होतो आणि शेवटी तुमच्याशी लग्न करण्यास तो नकार देतो.

नीना गुप्ता यांनी या व्हिडीओच्या शेवटी लग्न झालेल्या माणसाच्या प्रेमात न पडण्याचा सल्ला दिला आहे. स्वत:च उदाहरण देत त्यांनी असे न करण्याचा सल्ला त्यांच्या इन्स्टाग्रामवरील चाहत्यांना दिला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी त्याला ‘सच कहुँ तो’ असे कॅप्शन दिले आहे. हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर अनेकांनी त्यांच्या हिंमतीचे कौतुक केले आहे.

Leave a Comment