आता विमानात मिळणार वाय-फाय सुविधा

विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर आहे. आता प्रवाशांना विमानात उड्डाणा दरम्यान वाय-फाय सेवेचा लाभ घेता येणार आहे. केंद्र सरकारने भारतात एअरलाईन्सला विमानात प्रवाशांच्या सुविधेसाठी वाय-फाय सेवा देण्यास परवानगी दिली आहे.

नागरी उड्डाण मंत्रालयाने जाहीर करण्यात आलेले सुचनेनुसार, उड्डाणा दरम्यान जेव्हा लॅपटॉप, स्मार्टफोन, टॅबलेट, स्मार्टवॉच, ई-रडार अथवा अन्य उपकरण प्लाइट अथवा एअरप्लेन मोडवर असेल, तेव्हा पायलट विमानात प्रवाशांना वाय-फायद्वारे इंटरनेटचा वापर करण्यास परवानगी देऊ शकतो.

मागील शुक्रवारी विस्ताराचे सीईओ लेस्ली थंग यांनी बोइंग 787-9 विमानाच्या डिलिव्हरी दरम्यान दावा केला की, हे भारतात उड्डाणा दरम्यान विमानात वाय-फाय सेवा देणारे पहिले विमान असेल.

Leave a Comment