अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित सूर्यवंशीचा ट्रेलर रिलीज


नुकताच दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अभिनेता अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित सुर्यवंशी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. रोहित शेट्टीच्या सिंघम आणि सिंबा चित्रपटानंतर या आगामी चित्रपटाकडे सिनेरसिकांचे लक्ष आहे. अक्षय कुमारची दमदार अॅक्शन ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या चार मिनिटांच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

अक्षय कुमारसोबत सूर्यवंशी चित्रपटात अजय देवगन, रणवीर सिंह, कॅटरिना कैफ, जकी श्रॉफ, जावेद जाफरी हे देखील दिसत आहेत. चित्रपटातील ट्रेलरवरुन रणवीर सिंह आणि अजय देवगन पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे.

पोलीस दलावर आधारित सिंघम आणि सिंबा चित्रपटानंतर रोहित शेट्टीचा हा तिसरा चित्रपट आहे. हा चित्रपट येत्या 24 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सूर्यवंशीचा टीझर शेअर केला होता. अक्षयने या ट्विटला कॅप्शन देताना म्हटले होते की, गुन्हेगारीचा खात्मा होणार, कारण पोलीस येत आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरला काही वेळात लाखो व्ह्यूज यूट्युबला मिळाल्या आहेत.

Leave a Comment