विराटसारखे फिट दिसायचे आहे? मग आजमावा हे उपाय


जर तुम्हाला विराट कोहलीच्या सुपरफिट बॉडीचा हेवा वाटत असेल, जर त्याच्या फिटनेसचे रहस्य तुम्हाला जाणून घ्यायचे असेल, तर ते तुम्हाला आता समजणार आहे. धुवाधार खेळी करणारा भारतीय क्रीकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, आपले शरीर फिट ठेवण्याकरिता भरपूर व्यायाम तर घेतोच, पण त्याशिवाय आपल्या आहाराच्या बाबतीतही विराट अतिशय जागरूक आहे. त्यासाठी त्याला देण्यात आलेल्या डायट प्लॅनचे काटेकोर पालन विराट करीत असतो.

विराटला घरामध्ये बनविलेले जेवण जास्त आवडते. बाहेरचे अन्नपदार्थ विराट शक्यतो टाळतो. त्यामुळे जेव्हा शक्य असेल, तेव्हा घरीच जेवणे विराटला पसंत आहे. पण टीम इंडिया जेव्हा जगभरक्रिकेटच्या निमित्ताने दौरे करीत असते, तेच मात्र विराटला घरचे जेवण मिळू शकत नाही. अश्या वेळी लँब चॉप्स किंवा पिंक साल्मन, हे विराटचे आवडते पदार्थ आहेत.

‘जंक फूड’ हे फिटनेसच्या दृष्टीने अतिशय घातक असल्याचे विराटचे मत आहे. त्यामुळे स्वतःला फिट ठेवण्यासाठी विराट जंक फूड पासून लांब राहणे पसंत करतो. विराट त्याच्या डायट प्लॅनविषयी अतिशय जागरूक असून, त्यातील आहारनियमांच्या अनुसारच आहार घेणे तो पसंत करतो. त्यामुळे सर्वसाधारणपणे पसंत केले जाणारे फ्राइड चिकन किंवा फ्राइड चिप्स न खाता, विराट व्हीट क्रॅकर्स खाणे जास्त पसंत करतो.

विराटच्या मते स्वच्छ आणि शुद्ध पाणी आरोग्यासाठी अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांपेक्षा जास्त काळजी, विराट, तो पीत असलेल्या पाण्याबद्दल जास्त काळजी घेतो. घराबाहेर असताना विराट केवळ मिनरल वॉटरचेच सेवन करतो. विराट बहुतांश वेळी ‘ इव्हीयॉन ‘ पाण्याचे सेवन करणे पसंत करतो. हा मिनरल वॉटरचा फ्रेंच ब्रँड आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment