मुस्लिम आरक्षणाचे शिवसेनेकडून समर्थन


मुंबई : राज्यातील मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणानंतर आता मुस्लिम बांधवांनी देखील आरक्षणाची मागणी जोर लावून धरली आहे. महाविकास आघाडी मुस्लिम बांधवांना आरक्षण देण्याबाबत सकारात्मक भूमिकेत आहे. आता मुस्लिम आरक्षणाला शिवसेनेकडूनही समर्थन देण्यात आले असून नवाब मलिक यांच्या घोषणेला शिवसेना नेते व कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदेंनी पाठिंबा दिला आहे.

महाविकास आघाडीचा सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे. समाजाच्या हिताचे निर्णय ठाकरे सरकार घेईल असा विश्वासही यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. एकूणच शिवसेनेचा मुस्लिम आरक्षणाला पाठिंबा असल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या काही वर्षांपासून मुस्लिम समाज ५ टक्के आरक्षण मिळावे ही मागणी करत आहे. यासाठी आता सनदशीर मार्गाने लढा उभारणार असल्याचे खासदार हुसैन दलवाई यांनी सांगितले आहे. ठाकरे सरकारने मुस्लिम आरक्षणासंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकार लवकरच मुस्लिमांना आरक्षण मिळवून देण्यासाठी कायदा करणार आहेत. काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ही घोषणा केली आहे.

Leave a Comment