मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची वर्णी


मुंबई : परमबीर सिंह यांची संजय बर्वे यांच्या सेवानिवृतीमुळे रिक्त झालेल्या मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. परमबीर सिंग सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक आहेत. त्यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी राज्य सरकारकडून नियुक्ती करण्यात आली आहे. आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांची मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी वर्णी लागली आहे. ठाकरे सरकारने ही घोषणा परिपत्रक काढून केली. मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन संजय बर्वे निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी कुणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यापूर्वी परमबीर सिंह ठाण्याचे पोलीस आयुक्तही होते.

परमबीर सिंह यांचा थोडक्यात परिचय – 1988 बॅचचे परमबीर सिंह हे आयपीएस अधिकारी आहे. महाराष्ट्र पोलीस विभागातील अनेक पदांवर त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्राच्या पोलीस दलात 32 वर्ष सेवा करणारे परमबीर सिंह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक आहेत. त्यांनी मुंबई पश्चिम विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांनी 70 हजार कोटी सिंचन घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांना क्लीन चिट दिली होती. त्यांनी चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्याचे एसपी म्हणूनही काम पाहिले आहे. ते महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे उपप्रमुख देखील होते. महाराष्ट्र विधी व सुव्यवस्थेचे अतिरिक्त डीजीपी म्हणून काम पाहिले आहे.

Leave a Comment