कोरोनाच्या भितीने रद्द झाला सर्वात मोठा कार शो

पुढील आठवड्यात होणाऱ्या 2020 जिनिव्हा मोटार शोला (2020 Geneva Motor Show) कोरोना व्हायरसच्या भितीने रद्द करण्यात आले आहे. स्विर्झलँडच्या सार्वजनिक आरोग्य विभागने याबाबत सांगितले की, व्हायरसचा प्रसार होण्याच्या भितीने 1,000 पेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यात प्रतिबंध घालण्यात आले आहेत. हा निर्णय 15 मार्चपर्यंत लागू राहणार आहे.

याआधी कोरोना व्हायरसच्या भितीनेच बार्सिलोना येथे होणार मोबाईल वर्ल्ड काँग्रेस आणि फेसबुकची डेव्हलपर कॉफ्रेंस एफ8 देखील रद्द करण्यात आली आहे.

या वर्षी 2 मार्चला जिनिव्हा मोटार शो पत्रकारांसाठी सुरू होणार होता. तर सर्वसामान्यांसाठी 5 मार्च ते 15 मार्चदरम्यान या शोचे आयोजन केले जाणार होते.

आयोजकांनुसार, यावर्षी कार शो मध्ये जवळपास 10 हजार पत्रकार आणि 6 लाखांपेक्षा अधिक लोक भेट देणार होते. तर 220 प्रदर्शनकर्ते यात सहभागी होणार होते. जिनिव्हामध्ये दरवर्षी आयोजित केल्या जाणार्या या शोमध्ये जगभरातील महागड्या आणि लग्झरी गाड्या सादर केल्या जातात.

बीएमडब्ल्यूने सांगितले की, म्यूनिख येथून कंपनीच्या मुख्य कार्यालयातून लाईव्ह स्ट्रिमिंगद्वारे कॉन्सेप्ट आय4 सादर केली जाईल.