आता चीनमध्ये कुत्रे-मांजरी खाण्यास बंदी

चीनमध्ये कोरोना व्हायरसचे थैमान सुरूच असून, आतापर्यंत या व्हायरसमुळे 2,788 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. दररोज या व्हायरसची लागण झाल्याचे शेकडो प्रकरण समोर येत आहेत. चीनमध्ये आतापर्यंत 89,824 जणांना या व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे. इतर देशांमध्ये देखील या व्हायरसचा प्रसार होत आहे.

या व्हायरसची सुरूवातीला माहिती मिळाल्यानंतर याला दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील आता टीका करण्यात येत आहे.

या व्हायरसच्या प्रसारानंतर आता चीनच्या शेन्झेन प्रांतामध्ये कुत्रे, मांजर खाण्यावर बंदी घालण्याचे निश्चित झाले आहे. नोटीसमध्ये कुत्रे मांजर खाण्यावर बंदी घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र ही बंदी नंतर उठवली जाईल की नाही हे स्पष्ट नाही.

शेन्झेनमध्ये आता पाळतू प्राण्यांना खाल्ले जाणार नाही. याचे स्वागत अनेक अधिकाऱ्यांनी केले आहे. नोटीसमध्ये केवळ चिकन, बीफ, ससा, मासे, पोर्क आणि सीफूड खाण्यास सांगण्यात आले आहे.

प्राण्यांद्वारे कोरोना व्हायरसचा संसर्ग मनुष्याला होत असल्याचे वैज्ञानिकांना आढळले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या भागांमध्ये प्राण्यांना खाण्याविषयी अनेक नियम बनवले जात आहेत.

Leave a Comment