वर्सोवामार्गे विरारपर्यंत होणार वरळी-वांद्रे सी-लिंकचा विस्तार


मुंबई : वर्सोवापर्यत वरळी-वांद्रे सी-लिंक प्रकल्पाच्या विस्ताराचे काम अद्याप सुरू असताना, आता हाच सेतू थेट विरारपर्यत नेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. हा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संचालकांच्या बैठकीत घेण्यात आला असून अंतिम मान्यतेसाठी तो मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली पायाभूत सुविधा समितीकडे पाठवण्यात आला आहे.

वर्सोवामार्गे विरारपर्यंत वरळी-वांद्रे सी-लिंक नेला जाणार आहे. २०२४ च्या अखेरीस प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून ३२ हजार कोटींचा खर्च यासाठी अपेक्षित आहे. साडेतीन तासांचा नरिमन पॉईंट ते विरार प्रवास आहे. पण विस्तारानंतर फक्त सव्वा ते दीड तासात हा प्रवास पूर्ण होणार आहे.

राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची गुरुवारी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. हा प्रस्ताव त्यात राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला. वर्सोवा ते विरार मार्ग ५२ किलोमीटरचा असणार आहे. या मार्गावरून दररोज किमान दीड लाख वाहने धावतील अशी शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने कोस्टल रोडवरील बंदी उठवल्यानंतर नरिमन पॉइंट ते वरळी या मार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे. वांद्रे ते वर्सोवा मार्गाचे काम प्रगतिपथावर आहे.

Leave a Comment