विक्रम गोखलेंच्या ‘एबी आणि सीडी’चा टीझर रिलीज


लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला ‘एबी आणि सीडी’ हा मराठी चित्रपट येणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आले होते. या चित्रपटाचा टीझर आता रिलीज करण्यात आला आहे.

विक्रम गोखले आपल्या वृद्धत्वानंतर येणाऱ्या अनुभवांविषयी बोलताना या टीझरमध्ये दिसतात. तर, त्यांचे अमिताभ बच्चन हे खास मित्र असल्याचा अंदाज टीझरवरुन येतो. बऱ्याच वर्षानंतर त्यांची भेट होणार असते. अमिताभ तसे पत्र देखील विक्रम यांना पाठवतात. पण, ऐनवेळी या कार्यक्रमात अमिताभ हजेरी लावू शकतील की नाही, याबद्दल उत्कंठा वाढली आहे.

विक्रम गोखले आणि अमिताभ बच्चन या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र भूमिका साकारताना दिसणार आहेत. मराठी चित्रपटात अमिताभ बच्चन यांनाही भूमिका साकारताना पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार असल्यामुळे या चित्रपटाची बरीच उत्सुकता आहे. शिवाय अमिताभ यांचा आवाज टीझरच्या शेवटी सर्वांचे लक्ष वेधून घेतो.

या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलिंद लेले यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती अक्षय बरदापूरकर, अभयानंद सिंग, अरविंद रेड्डी, कृष्णा परसोद आणि पीयूष सिंग यांनी केली आहे. हा चित्रपट १३ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment