रिकाम्या पोटी तुपाचे सेवन करणे फायदेशीर


वजन वाढायला लागले, की आपला आहार नियंत्रित करून ते कसे कमी करावे याबद्दल अनेक जण अनेक सल्ले देत असतात. सर्वात प्रामुख्याने सल्ला दिला जातो तो तूप न खाण्याचा. त्याचबरोबर सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी त्यामध्ये मध आणि लिंबू घालून पिणे हा आणि असे अनेक सल्ले दिले जातात. ह्या उपायांनी वजन कमी होते, पण जर आपल्या आहारात आपण वर्ज्य केलेल्या तुपाचा समावेश केला, तर त्याचे अनेक फायदे आपल्या आरोग्याला होऊ शकतात. पण त्याचबरोबर तूप किती खावे आणि कसे खावे याचाही विचार होणे आवश्यक आहे.

आयुर्वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे दररोज सकाळी उठल्याबरोबर इतर काहीही न खाता रिकाम्या पोटी तुपाचे सेवन केल्याने त्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला मिळतात. यासाठी सकाळी एक ग्लास कोमट पाण्याबरोबर एक चमचा तुपाचे सेवन करावे. त्यानंतर अर्धा तास काहीही खाऊ नये. रिकाम्या पोटी तूप घेतल्याने त्वचेचे आरोग्य सुधारते. त्वचेचा कोरडेपणा नाहीसा होऊन त्वचा मुलायम, नितळ दिसू लागते. तुपामुळे त्वचेला आर्द्रता मिळत असल्याने रुक्ष झालेली त्वचा मृदू होते. प्सोरायसीस सारखे त्वचेचे विकार असणाऱ्यांनी या उपायाचा अवलंब अवश्य करण्याचा प्रयत्न करावा.

तुपाच्या सेवनाने सांध्याची दुखणी बरी होण्यास मदत होते. तुपामध्ये असलेली ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत करीत असून, रिकाम्या पोटी केल्या गेलेल्या तुपाच्या सेवनाने ऑस्टीयोपोरोसीस सारखे आजार बरे होण्यास मदत होते. तुपाच्या सेवानाने पाचनक्रिया चांगली रहात असून, त्याने वजन घटविण्यासही मदत मिळते. रिकाम्या पोटी तुपाचे सेवन केल्याने केसांची गळती कमी होते. तसेच केसांना व स्काल्प ला पोषण मिळून, केस मुलायम आणि चमकदार दिसू लागतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment