आरोग्यासाठी लिंबाचे असेही फायदे


लिंबू हे फळ आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी आहेच, पण त्याशिवाय त्वचेच्या सौंदर्यासाठी देखील याचा वापर करण्याची पद्धत फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. लिंबाचा सुवास हा मन प्रफुल्लित करणारा आहे. किंबहुना मन उदास असताना लिंबाचा सुवास मनाला प्रसन्नता देणारा असल्याचे तज्ञ म्हणतात. लिंबामध्ये जीवाणू प्रतिरोधक तत्वे आहेत. लिंबाचा रस हा केवळ त्वचेसाठी नाही, तर केसांच्या उत्तम आरोग्यासाठीही उपयुक्त आहे. लिंबाचा रस त्वचेवर लावल्याने त्यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग, मुरुमे, पुटकुळ्या, आणि इतर समस्या कमी होण्यास मदत होते. लिंबाच्या फोडी गुडघ्यांवर किंवा कोपरांवर चोळल्यास तेथील काळसरपणा आणि कोरडेपणा दूर होऊन तेथील त्वचा मुलायम होण्यास मदत होते. नखांवर आलेला पिवळेपणा हटविण्यासाठीही लिंबाचा रस उपयुक्त आहे.

लिंबाचा रस संधिवात, आणि पचनाशी निगडित समस्या दूर करण्याच्या उद्देशाने उपयुक्त आहे. तसेच ज्यांना किडनीशी निगडित विकार असतील, त्यांच्यासाठी लिंबाच्या रसाचे पाण्यामध्ये मिसळून केले गेलेले सेवन उपयुक्त ठरते. या रसाच्या नियमित सेवनाने मलेरिया आणि कॉलरा सारख्या रोगांची प्रतिकारशक्ती शरीरामध्ये निर्माण होत असते. लिंबामध्ये क जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर असून, यामध्ये इ आणि अ जीवनसत्वे, तांबे, क्रोमियम, आणि भरपूर प्रमाणांत अँटी ऑक्सिदंट्स असतात.

लिंबाच्या फोडी रात्री झोपताना झोपण्याच्या खोलीमध्ये ठेवल्याने खोलीतील हवा जन्तुमुक्त होते, तसेच खोलीमध्ये लिंबाचा मन प्रसन्न करणारा सुवासही दरवळत राहतो. रात्री झोपण्या पूर्वी लिंबाच्या फोडी झोपण्याच्या खोलीमध्ये ठेवल्या गेल्यास सर्दी-पडसे, किंवा एखादी अॅलर्जी लवकर बरी होण्यास मदत होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment