माझ्यावर पीएचडी करण्यासाठी चंद्रकांत पाटलांना 10-12 वर्षे लागतील : शरद पवार


मुंबई : युवकांमध्ये देशाचे भवितव्य घडवण्याची ताकद असल्यामुळे तरुणांना संधी मिळालीच पाहिजे. याबाबत माझे स्पष्ट मत आहे की पुन्हा कॉलेजमध्ये निवडणुका सुरु करायला हव्या. त्यामुळे कॉलेज तरुणांना संधी मिळेल. पण त्यापूर्वी काळजी घ्यावी, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

देशाच्या प्रगतीसाठी युवकांना योग्य दिशेने मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने या उद्देशाने ‘संवाद साहेबांशी’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मार्गदर्शनपर मुलाखत घेण्यात आली. त्यांनी या मुलाखतीत सडेतोड उत्तर दिली.

यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही शरद पवार यांनी टोला लगावला. माझ्यावर पीएचडी करायची असेल, तर चंद्रकांत दादांना 10 ते 12 वर्षे वेळ काढावा लागेल, असे शरद पवार म्हणाले. २२ फेब्रुवारीलाच मी पहिली निवडणूक जिंकली होती. पूर्वीच्या कालखंडात यात खूप अभ्यास करावा लागायचा. यानंतर पक्षनेत्याची जबाबदारी अंगावर पडली. चढत्या क्रमाने जरी वर गेलात, यशस्वी झालात तरी देखील पाय जमिनीवर हवेत. एकंदर परिस्थिती लक्षात घ्यायची. कधीही ना उमेद व्हायचे नाही, असा सल्लाही पवारांनी विद्यार्थ्यांना दिला.

मुंबईला एकेकाळी देशाची राजधानी म्हटले जायचे. पण मी आता अस्वस्थ होतो. कारण गिरणी कामगारांची मुंबई होती. आज इमारती आल्या आणि मुंबईकर गायब झाला. मुंबईत आता सर्व्हिस सेक्टर आले आहेत. त्यात आपण ताबा मिळवला पाहिजे, असेही शरद पवार म्हणाले.

Leave a Comment