अन् डोनाल्ड ट्रम्प यांना देखील भावला बाहुबली अवतार


नवी दिल्ली – उद्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्यानिमित्त देशात जय्यत तयारी करण्यात येत आहे. भारतात येण्यासाठी ट्रम्प हे देखील उत्सुक आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत दौऱ्यावर निघण्याच्या काही तास आधी प्रसिद्ध बाहुबली २ चित्रपटातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओमध्ये बाहुबलीच्या चेहऱ्याच्या जागी ट्रम्प यांचा चेहरा एडिट केलेला आहे.


हा व्हिडिओ एका ट्विटर युझरने पोस्ट केल्यानंतर हा व्हिडिओ खुद्द ट्रम्प यांनी शेअर केला आहे. एका चांगल्या मित्राकडे म्हणजेच भारतात येण्यासाठी उत्सुक असल्याचे ट्रम्प यांनी या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. या व्हिडिओला तब्बल ७० हजार जणांनी लाईक केले आहे.

Leave a Comment