विमानातील सीट झोपण्यासाठी नाही – नागरी उड्डाण मंत्रालय

काही दिवसांपुर्वी अमेरिकन एअरलाईन्सच्या एका प्रवाशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये प्रवासी आपल्या पुढे बसलेल्या महिलेच्या सीटवर ठोसे मारत होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विमानात सीटवर बसल्यावर रिक्लाईन करावे की नाही, यासंबंधीत दोन गट पडले होते. आता नागरी उड्डाण मंत्रालयाने उड्डाना संबंधित काही शिष्टाचार शेअर केले आहेत.

नागरी उड्डाण मंत्रालयाने ट्विट केले की, थोडासा शिष्टाचार आणि आदर नक्कीच चांगला आहे. तुमचे सीट काही स्लिपर बर्थ नाही. इतर लोकांना त्रास होईल असे वागू नये.

यासोबतच मंत्रालयाने सांगितले की, जर तुम्ही कमी जागेत रिक्लाईन करत असाल, तर नक्कीच काळजी घ्या, तुमच्या आजुबाजूच्या लोकांचा नक्कीच विचार करा, कारण कोणालाही तुमचे डोके त्यांच्या मांडीवर नको असते.

https://twitter.com/ambarish_sn/status/1231177990781849600

मंत्रालयाच्या या ट्विटने काही नेटकऱ्यांना रिक्लायनर सीट ही झोपण्यासाठीच असते, असे म्हटले तर काहींनी पाय ठेवण्यासाठी असलेली जागा वाढवावी असा तर्क दिला.

आपल्या आणखी एका ट्विटमध्ये मंत्रालयाने सांगितले की, एक जबाबदार प्रवासी बना व स्मार्ट प्रवास करा.

काही दिवसांपुर्वी व्हायरल झालेला व्हिडीओमध्ये एक व्यक्ती अमेरिकन एअरलाईन्समध्ये सलग पुढील प्रवाशाच्या सीटवर ठोसे मारत होता. प्रवासी विमानात अखेरच्या सीटवर बसलेला होता व पुढे बसलेली महिला रिक्लाईन झाली होती, त्यामुळे त्या प्रवाशाला त्रास होत होता. हा व्हिडीओ 50 हजारांपेक्षा अधिक वेळा पाहण्यात आला आहे.

Leave a Comment