या उद्योगपतीला गर्लफ्रेंड शोधून देणाऱ्याला मिळणार लाखो रुपये बक्षीस

अमेरिकेतील उद्योगपती जेफ गेबहार्टने स्वतःसाठी गर्लफ्रेंड शोधण्यासाठी एक डेटिंग वेबसाईट लाँच केली आहे. या साईटद्वारे जी व्यक्तीला जेफला गर्लफ्रेंड शोधून देईल, त्याला 17 लाख 92 हजार रुपये (25 हजार डॉलर) बक्षीस मिळणार आहे. 47 वर्षीय जेफ गेबहार्टला अशी गर्लफ्रेंड पाहिजे, जी त्याला चांगल्या व वाईट गुणांसह स्विकार करू शकेल.

जेफ ट्रेडिशनल आणि ऑनलाईन डेटिंगला कंटाळला आहे. त्यामुळे आता त्याने वेबसाईटद्वारे बक्षीसाची घोषणा करत एक कॅम्पेन सुरू केले आहे. मागील आठवड्यातच त्याने डेट जेफ जी (DateJeffG.com) नावाची एक वेबसाईट लाँच केली आहे.

जेफ गेबहार्ट सांगतो की, नात्यामध्ये मी एक सपोर्टिव्ह, मोकळे विचार असणारा, दयाळू आणि मजेशीर व्यक्ती आहे. मला आशा आहे की माझी लाईफ पार्टनर देखील मला असेच स्विकारेल. मला अशी मुलगी हवी आहे, जिच्यात आत्मविश्वास असेल व ती मजेदार असावी. ती मुलगी सकारात्मक विचार करणारी असावी व दुसऱ्यांसोबत देखील प्रेमाने वागणारी असावी.

जेफचे हे कॅम्पेन कधीपर्यंत चालणार हे माहिती नाही. मात्र यात निवड होणे देखील सोपी गोष्ट नाही. जेफच्या वेबसाईटवर जाऊन सर्वात प्रथम अर्ज करावा लागेल. त्यानंतर एक ऑनलाईन सर्वेक्षण पुर्ण करावे लागेल. हे सर्वेक्षण एका क्लिनिकल मनोवैज्ञानिकाने तयार केले आहे. याद्वारे जेफला मुलीला न बघता अंदाज येईल की त्यांचा ताळमेळ बसेल की नाही. यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होईल.

Leave a Comment