अवघ्या 3 तासात 1400 किमी अंतर पार करून दिल्लीला पोहचले ह्रदय

पोलिसांच्या ग्रीन कॉरिडोरमुळे अवघ्या तीन तासात 1400 किमी अंतर पार करून ह्रदय पुण्यावरून दिल्लीला पोहचवण्यात आले. ओखलाच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी 34 वर्षीय महिलेच्या शरीरात ह्रदय प्रत्यारोपण केले.

मंगळवारी 3.30 वाजता फोर्टिस हॉस्पिटलच्या डॉक्टरांची टीम पुण्यावरून रवाना झाली आणि सायंकाळी 5 वाजून 40 मिनिटांनी ही टीम दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर होती. त्यानंतर पोलिसांच्या 18.4 किमी लांब ग्रीन कॉरिडोरच्या मदतीने अवघ्या 21 मिनिटे 20 सेंकदामध्ये ह्रदय हॉस्पिटलमध्ये पोहचवण्यात आले. हॉस्पिटलमध्ये पोहचल्यानंतर डॉक्टरांनी यशस्वीरित्या ह्रदय प्रत्यारोपण केले.

हॉस्पिटलचे वरिष्ठ डॉक्टर जेएस मेहरवाल यांनी सांगितले की, दिल्लीची 34 वर्षीय महिला हार्ट फेलियर होती. पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये एक 47 वर्षीय रुग्ण ब्रेन डेड असल्याचे समजले. त्यांच्या कुटुंबाने अवयवदान करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर डॉक्टरांची टीम पुण्याला रवाना झाली.

Leave a Comment