परळीत पालकमंत्र्यांकडून छत्रपतींच्या संस्कारांची पायमल्ली, पंकजा मुंडेंचा निशाणा


मुंबई : ‘ट्विटर’च्या माध्यमातून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी निशाणा साधला आहे. परळी येथील व्यापारी आणि सामान्य जनतेवर शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात अन्याय जनतेने केलेले बंद ही परिस्थिती तर छत्रपतींच्या संस्कारांची पायमल्ली असल्याचे ट्विट पंकजा मुंडे यांनी केले आहे.


त्याचबरोबर आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये पंकजा मुंडे यांनी परळीत गुंडागर्दी, हफ्तेखोरी, माफिया राज करायचे आणि पोलिसांनी कर्तव्य बजावल्यावर, गुन्हे दाखल झाल्यावर मग ‘गय करणार नाही ‘अशी भाषा करायची हे दुटप्पी धोरण असून गुंडांचे आत्मबल वाढवणारे पालकत्व आमच्या बीडला मिळाले हे दुर्दैव आहे. मात्र, हे खपवून घेतले जाणार नाही, असे म्हटले आहे.


दरम्यान, सोमवारी दुपारी परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेली ‘गुंडगिरी’ कॅमेरात कैद झाली. गाड्यांची तोडफोड करुन एका व्यापाऱ्याला मारहाण करणारे हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्याचे समोर आले होते. परळीतील व्यापारी मारहाण प्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला होता. पण छत्रपतींच्या संस्कारांची बीडच्या पालकमंत्र्यांकडून पायमल्ली केल्याची टीका पंकजा मुंडे यांनी केली आहे.


धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी सोमवारी दुपारी परळीत टॉवर चौक परिसरात एका व्यापाऱ्याला बेदम मारहाण केली होती. एवढेच नाही तर मुंडे समर्थकांनी चौकात उभ्या असलेल्या काही गाड्यांचीही तोडफोड केली होती. राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी दहशत पसरवत सार्वजनिक मालमत्तेची नासधूसही केली होती. या परिसरामध्ये बसवलेल्या वेगवगेळ्या सीटीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला आहे. परळी आणि बीड जिल्ह्यात सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे.

Leave a Comment