ही खाजगी कंपनी घडवणार प्रवाशांना अंतराळ सैर

अमेरिकेची खाजगी अंतराळ कंपनी स्पेसएक्स लवकरच इतिहास रचणार आहे. इलेक्ट्रिक वाहन बनविणारी टेस्ला कंपनीचे सीईओ यांच्याच मालकीची ही कंपनी आहे. ही कंपनी लवकरच आपल्या क्रू ड्रॅगन यानाद्वारे अंतराळ प्रवाशांना आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर घेऊन जाणार आहे.

अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. या घोषणेमुळे विमान कंपनी बोइंगच्या अंतराळ योजनेला मोठा झटका बसला आहे. अंतराळ प्रवासी असणारे क्रू ड्रॅगन कॅप्सूलने आपले परीक्षण देखील पुर्ण केले आहे.

जानेवारी महिन्यात फ्लोरिडा येथील जॉन एफ कॅनेडी स्पेस सेंटरमध्ये या कॅप्सूलचे यशस्वी परीक्षण करण्यात आले. यावेळी क्रू ड्रॅगनला फॉल्कन-9 रॉकेटद्वारे लाँच करण्यात आले होते. जवळपास 16 किमी उंचीवर गेल्यानंतर रॉकेटचे इंजिन बंद करण्याता आले होते. एवढ्या उंचीवरून पडण्यास केवळ 9 मिनिटे लागली. क्रू ड्रॅगनला 4 पॅराशूटच्या मदतीने अटलांटिक महासागरात उतरविण्यात आले.

स्पेसएक्सचे डेमो-2 अंतराळ प्रवाशांसाठी फाल्कन 9 बूस्टर बी1058, एक फॉल्कन वरील श्रेणी, क्रू ड्रॅगन कॅप्सूल सी 206 आणि एक क्रू ड्रॅगन घेऊन जाणाऱ्या ट्रंकचे यशस्वी परीक्षण करण्यात आले आहे.

एलॉन मस्क यांनी घोषणा केली होती की, त्यांना 2050 पर्यंत 10 लाख लोकांना मंगळावर पाठवायचे आहे. त्यांचे रॉकेट या ग्रहासाठी दरवर्षी अनेक मेगाटन कार्गो घेऊन जाईल. यामुळे काही वर्षात मनुष्यासाठी मंगळ ग्रह तयार होईल.

विमान कंपनी बोइंग देखील तीन अंतराळ प्रवाशांना घेऊन आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनला जाणार होती. मात्र बोइंगच्या कॅप्सूलचे  यशस्वी परीक्षण झाले नाही.

Leave a Comment