गगनयानसाठी निवडलेल्या अंतराळवीरांचे असे सुरू आहे प्रशिक्षण

भारताचे महत्त्वकांक्षी मानवी अंतराळ मिशन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी हवाईदलाचे चार पायलट रशियामध्ये प्रशिक्षण घेत आहेत. हे पायलट जबरदस्त थंडी आणि बर्फाच्छादित भागात प्रशिक्षण घेत आहेत. मॉस्को येथील गागरिन रिसर्च अँड टेस्ट कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये होत असलेल्या या गुप्त प्रशिक्षणादरम्यान पायलट समुद्रात खोल जाऊन राहणे, जंगलात शारीरिक श्रम व अधिक प्रगतीशील इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहेत.

5 वर्षांचे प्रशिक्षण एका वर्षात पुर्ण करण्याचे लक्ष्य ठेवलेल्या या पायलट्सना अनेकदा प्राण धोक्यात घालावे लागत आहेत. हे भारतीय पायलट रशियन भाषेत प्रशिक्षण घेत असून, यासाठी त्यांना ती भाषा शिकवली जात आहे.

Image Credited – Amarujala

मॉस्कोच्या जंगलामध्ये त्यांना हिंस्त्र प्राण्यांशी लढण्याची ट्रेनिंग दिली जात आहे. तसेच अंतराळातून परतताना काही बिघाड झाल्यास अशा परिस्थितीमध्ये जिंवत राहण्यासाठी काय करावे, हे शिकवले जात आहे.

त्यांना 3 दिवस व 2 रात्र जिंवत राहण्यासाठी कठोर प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षणानंतर पायलट्सना आठवड्याची सुट्टी देखील दिली जाणार आहे.

Image Credited – Amarujala

भारतीय पायलट्सना रशियन भाषेसोबतच रशियन जेवण देखील अडचण ठरत आहे. सेंटरमध्ये पायलट्सच्या आवडीचे जेवण बनवले जात आहे. त्यांना शाकाहारी जेवण दिले जात आहे.

गगनयान मिशनसाठी वर्ष 2022 हे लक्ष्य निश्चित करण्यात आलेले आहे. यासाठी 10 हजार कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत. अंतराळात मानव मिशन पाठवणारा भारत जगातील चौथा देश ठरेल.

Leave a Comment