‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज


गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात ‘सविता भाभी…. तू इथंच थांब !!’ असे लिहिलेले होर्डिंग्ज चर्चेत आले होते. ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ चित्रपटाचे हे होर्डिंग्ज होते. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. सगळीकडे या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे.

तरूणाईत ‘सविता भाभी’ या पात्राची क्रेझ आहे आणि दहीहंडी कार्यक्रमाला याच सविता भाभीला प्रमुख पाहुणी म्हणून बोलवायची अशी चर्चा रंगली आहे. या मंडळींची त्या निमित्ताने नेमकी कशी तयारी सुरू होते हे या ट्रेलरमधून दाखवण्यात आले आहे. चित्रपटातील पात्र ट्रेलरच्या माध्यमातून उलघडली गेली आहे. फक्त सविता भाभीचा आवाज टिझरमधून ऐकू येत होता. अभिनेत्री सई ताम्हणकरने ही सविता भाभी साकारली आहे. अभिनेत्री पर्ण पेठे या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

अश्लील शब्द उच्चारला तरी अनेकांच्या नजरा आपल्यारकडे आपसूक वळतात. पण आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’हा चित्रपट येणार असल्यामुळे या चित्रपटाच्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगल्या आहेत. या चित्रपटातून अलोक राजवाडे दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. सायली पाठक, पर्ण पेठे, अक्षय टांकसाळे, ऋतुराज शिंदे, केतन विसाळ, विराट मडके हे कलाकार चित्रपटात आहेत. हो चित्रपट 6 मार्च 2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Leave a Comment