संशोधन; स्मार्टफोनचा अतिरेक मानसिक आरोग्यास घातक

स्मार्टफोनच्या अती वापराचा डोळ्यांवर परिणाम होतो, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मात्र एका अभ्यासात समोर आले आहे की, स्मार्टफोनचा अतिरेक युवकांच्या मानसिक आरोग्यावर देखील प्रभाव टाकत आहे. कॅनेडियन मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये हे संशोधन  प्रकाशित झाले आहे. यामध्ये केवळ स्मार्टफोनचा वापर करणाऱ्यांचा अभ्यास करण्यात आला होता. मोबाईलवर गेम खेळणाऱ्या युवकांचा यात समावेश नव्हता.

द हॉस्पिटल ऑफ सिक चिल्ड्रनच्या अभ्यासानुसार, पालकांनी व शिक्षकांनी मुलांची झोप, शाळा-कॉलेजचा अभ्यास, सोशल एक्टिव्हिटी, ऑनलाईन एक्टिव्हिटी या सर्वांमध्ये ताळमेळ बसवण्यास मदत करायला हवी. सिक किड्स हॉस्पिटल आणि टोरंटो वेस्टर्न यूनिवर्सिटीच्या डॉ. इलिया एबी यांच्यानुसार, शिक्षक, कुटुंबातील सदस्य आणि डॉक्टरांनी स्मार्टफोनच्या प्रभावापासून मुलांना वाचवण्यासाठी मिळून उपाय शोधणे गरजेचे आहे.

एबी यांनी सांगितले की, या अभ्यासामध्ये सर्वांसाठी चितेंचे ठरलेल्या विषयांचा समावेश होता. जसे की, सोशल मीडिया मुलांना स्वतःला नुकसान पोहचवण्यास उकसवतो ? स्मार्टफोनच्या अती वापरामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होतो का ? सोशल मीडिया आणि स्मार्टफोनमुळे युवकांच्या झोपेवर कसा परिणाम होतो ?

या मुद्यांवर समोर आले की, स्मार्टफोनच्या अतिरेकामुळे युवकांमध्ये चिडचिडपणा, राग आणि तणावाची समस्या पाहण्यास मिळते. स्मार्टफोनच युवकांचे आयुष्य झाले आहे.

Leave a Comment