मुंबईतील माझगाव येथील जीएसटी भवनाला भीषण आग


मुंबई – आर्थिक राजधानी मुंबईमधील माझगाव येथे असलेल्या जीएसटी भवनाला भीषण आग लागली असून ही आग इमारतीच्या आठव्या मजल्यावर लागली आहे. अग्निशमन दलाचे २० बंब ही भीषण आग नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या ठिकाणी आग नियंत्रणात आणण्याचे काम वेगाने सुरु आहे. अग्निशमन दलाने लेव्हल थ्री ची आग लागल्याचे म्हटले आहे. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी कसोशीचे प्रयत्न सुरु आहेत.

(व्हिडीओ सौजन्य – समीर कांबळे)

नेमकी कोणत्या कारणामुळे ही आग लागली ते अद्याप समजू शकलेले नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार हे ही आग लागल्याचे समजताच बैठक सोडून घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. वरचे दोन मजले रिकामे होते तिथे नुतनीकरण सुरु असल्यामुळे या ठिकाणी कर्मचारी नव्हते. घटनास्थळी धुराचे लोट आणि आगीचे लोळ दिसत आहेत. ही भीषण सातव्या आणि आठव्या मजल्यावर आग लागली आहे. आग नियंत्रणात आणण्यासाठी १०० पेक्षा जास्त कर्मचारी हे प्रयत्न करत आहेत. ही आग दुपारी १ वाजण्याच्या सुमारास लागली आणि त्यानंतर आगीने रौद्ररुप धारण केले आहे. ही आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Leave a Comment