हॉटेलच्या सिंकमध्ये आंघोळ करतानाचा कर्मचाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल

अमेरिकेच्या मिशिगन येथील एका प्रसिद्ध हॉटेलच्या किचनमधील सिंकमध्ये आंघोळ करतानाचा एका कर्मचाऱ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडीओ सोबत लिहिण्यात आले आहे की, ग्रीनव्हिले वेंडीज रेस्टोरंटमध्ये जाऊ नका. ते खूपच खराब आहे.

So yeah I’m just gonna tell everyone right now DO NOT GO TO THE GREENVILLE WENDYS. THIS IS DISGUSTING PLEASEEEEEE SHARE THIS

Posted by Connor Somerfield on Tuesday, February 11, 2020

व्हिडीओमध्ये एक मुलगा किचनच्या मोठ्या सिंकमध्ये बसून आंघोळ करताना दिसत आहे. आणि हॉटेलचा गणवेश परिधान केलेला दुसरा कर्मचारी त्याला ‘व्यवस्थित आंघोळ कर’ असे सांगत आहे. व्हिडीओमध्ये मुलगा आंघोळ करताना स्पष्ट दिसत आहे.

आंघोळ करताना मुलगा ‘हे एखाद्या हॉट टब असल्याचा अनुभव येत आहे’, असे म्हणत आहे.

हा मीडिया विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाल्यानंतर युजर्सच्या तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या हॉटेलमध्ये कधीच जाणार नसल्याचे सांगितले. फेसबुकवर आतापर्यंत 2 लाखांपेक्षा अधिक जणांनी हा व्हिडीओ बघितला आहे.

Leave a Comment