पाकिस्तानच्या अबोटाबाद मध्ये सापडला पहिला करोना रुग्ण


चीनच्या वुहान प्रांतातून केवळ चीनच नव्हे तर जगभर फैलावलेल्या करोना विषाणूचा पहिला रुग्ण पाकिस्तानात अबोटाबाद येथे आढळला असून त्याला अयुब हॉस्पिटल मध्ये आयसोलेशन वॉर्ड मध्ये ठेवले गेल्याचे समजते. पाकिस्तानात आढळलेला करोनाचा हा पहिलाच पेशंट असून तो नुकताच चीन मधून परतला असल्याचे सांगितले जात आहे.

पाकिस्तानच्या गील्गीट बाल्टीस्थान भागात असलेले अबोटाबाद काही वर्षांपूर्वी अचानक चर्चेत आले ते अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याला अमेरिकेच्या सील कमांडोनी येथे ठार केले तेव्हा. पाकिस्तान मधील अनेक विद्यार्थी चीनच्या वुहान प्रांतात अडकले असून त्यांनी सरकारला त्यांची सुटका करावी अशी वारंवार विनंती केली आहे. मात्र पाक सरकारने त्यांना तेथेच राहावे अश्या सूचना दिल्या आहेत असेही सांगितले जात आहे.

चीनच्या वुहान प्रांतात नव्याने करोना केसेस आढळत असून या साथीला बळी पडलेल्यांची संख्या आता १६६५ वर पोहोचली आहे. ६८५०० लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. नवीन २००९ केसेस समोर आल्या आहेत आणि आशियाबाहेर या विषाणूचा पहिला मृत्यू फ्रांस मध्ये नोंदविला गेला असल्याने जगभर चिंता व्यक्त होत आहे. फ्रांस मध्ये पर्यटक म्हणून आलेला ८० वर्षे वयाचा एक चीनी माणूस कोरोना मुळे मरण पावला आहे असे फ्रांसचे आरोग्य मंत्री इग्नेस बुजीन यांनी जाहीर केले आहे. फिलीपिन्स, हॉंगकॉंग आणि जपान मध्ये या विषाणूमुळे प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे.

Leave a Comment