अप्रतिम गोल करणाऱ्या 10 वर्षीय चिमुकल्याची थेट मेस्सीशी तुलना

केरळच्या 10 वर्षीय फुटबॉलरचा गोल करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या गोलमुळे या छोट्या खेळाडुची तुलना फुटबॉलपटू मेस्सीशी होऊ लागली आहे.

या 10 वर्षीय फुटबॉलपटूचे नाव दानी असल्याचे सांगितले जात आहे. त्याने झिरो अँगलवरून (कॉर्नर) असा गोल केला की, प्रत्येकजण हैराण झाला आहे. या गोलचा व्हिडीओ दानीच्या आईने सोशल मीडियावर शेअर केले आहे.

9 फेब्रुवारीला मीनान्गडी येथे पार पडलेल्या ऑल केरळ किड्स फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्यात दानीने हा गोल केला. त्याने केरळ फुटबॉल ट्रेनिंग सेंटरकडून खेळताना सामन्यात हॅट्रिक केली. स्पर्धेत 13 गोल करणाऱ्या दानीला ‘प्लेअर ऑफ द ट्रुर्नामेंट’ म्हणून देखील निवडण्यात आले.

भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार विजयन यांनी देखील दानीचा हा व्हिडीओ शेअर करत त्याचे कौतूक केले.

https://twitter.com/zesteychetan/status/1227136906795929601

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून, नेटकरी या मुलाचे कौतूक करत आहेत.

Leave a Comment